कशी होती भारतातील ऐतिहासिक शिक्षणव्यवस्था?
ऑक्टोबर 23, 2012वेळ म्हणजे नेमकं काय हो?
सप्टेंबर 25, 2011वेळ आली, वेळ झाली, वेळ गेला असं आपण म्हणतो. पण कधी विचार केलाय हा वेळ किंवा ज्याला आपण काळ म्हणतो, म्हणजे नेमकं काय? घड्याळ थांबतं पण वेळ थांबत नाही. कधी वेळेला नियंत्रणात आणता आलं तर काय धमाल येईल नाही का? पण वेळ म्हणजे नक्की काय संकल्पना आहे?
वेळ हि अद्भुत संकल्पना आहे. आपण त्रिमितीय अस्तित्व (3D existence) किंवा अवकाश (space) लांबी, रुंदी आणि उंची ह्या परिमाणांचा वापर करून मोजतो. पण वेळ म्हणजे अस्तित्वाची हालचाल किंवा अस्तित्वातले बदल मोजण्याची मिती. याला आपण चौथी मिती पण म्हणू शकतो (Fourth dimension). लांबी असल्याशिवाय रुंदी असू शकत नाही. लांबी आणि रुंदी असल्याशिवाय उंची असू शकत नाही. आणि लांबी-रुंदी-उंची असल्याशिवाय वेळ असू शकत नाही. आता हे काय भलतंच? पण थोडा विचार करा.
तुमच्या समोर एक वस्तू आहे. तिचं अस्तित्व आहे. कारण त्याला काहीतरी लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे. आता पुढे कल्पना करा, ती वस्तू १० मिनिटांपासून तुमच्या समोर आहे. १० मिनिटांपासून आहे, म्हणजे तिचं अस्तित्व आहे, बरोबर? आता कल्पना करा, ती वस्तू १ मिनिटांपासून तिथे आहे. तरीपण तिचं अस्तित्व आहे. पण समजा ती वस्तू शून्य (०) मिनिटांपासून तिथे आहे. म्हणजे तिचं अस्तित्व शून्य आहे. याचा अर्थ तिचं अस्तित्वच नाही. वेळ आहे म्हणून तिचं अस्तित्व आहे. आता समजा, ती वस्तू ज्या जागेवर आहे, तिथून ५ इंच पुढे जाते. म्हणजे काहीतरी हालचाल होते. ती हालचाल जरी काही तरी एका सेकंदात झाली असेल, पण तरी काही वेळ लागला तेव्हा आपल्याला सांगता येतं की हालचाल झाली. जर ती हालचाल शून्य सेकंदात झाली तर, हालचाल झाली असे सांगता येईल काय?
आईनस्टाईनच्या सिद्धांतानुसार वेळ आणि अवकाश या दोन्ही गोष्टी परस्परसलंग्न आहेत. वेळ आहे म्हणून सर्व आहे, आणि सर्व आहे (तीनही मिती आहेत) आणि त्यांची हालचाल आहे म्हणून वेळ आहे.
जर काहीच नाही, तर वेळ असेल का? विश्वनिर्मितिच्या आधी वेळ ही संकल्पना होती का? वरील तर्क विचारात घेतल्यास विश्व निर्माण व्हायच्या आधी वेळच नव्हती असा निष्कर्ष निघतो. विश्वनिर्मिति च्या वेळेस उर्जा, वेळ आणि अवकाश तयार झाले असं मानतात. पण विश्वनिर्मिती ही एक घटना आहे. आणि घटना घडली असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वेळ ही संकल्पना आलीच हो.
कालाय तस्मे नमः ||
मराठी माणसाच्या भल्यासाठी राज ठाकरे यांनी शिवसेनेत परत यावे का?
ऑक्टोबर 20, 2009असा विचार करण्याला काही अर्थ नाही हो. शिवसेना कधी काळी एक तेजस्वी आणि जहाल संघटना होती. कारण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे नावाचे तडफदार व्यक्तिमत्व शिवसेना चालवित होते. आज आपल्याला शिवसेनेमध्ये पूर्वीसारखा जोम दिसत नाही….कारण अगदी सरळ आहे. आज बाळासाहेब सक्रीय नाहित. वयोमानानुसार ते राजकारणात पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नाहित. पण शिवसेनेतल्या इतर मंडळींचे काय? सत्ताधीशांवर विरोधी पक्षाने जो अंकुश ठेवायला पाहिजे तो ठेवला नाही तर सत्ताधीश शिरजोर होतात. तो अंकुश शिवसेना-भाजप युतीने ठेवला नाही.
आज कोणत्याही क्षेत्राचे उदाहरण घ्या, जिथे माणसं दमदार आहेत, कर्तृत्ववान आहेत तेथेच उत्कर्ष होतो आणि झपाट्याने होतो. राजकारणातसुद्धा हा नियम लागु पडतो. शिवसेनेत काही आज असली माणसचं नाहीत असं ठामपणे म्हणता येणार नाही परन्तु जी आहेत त्यांचा प्रभाव कुठेतरी नक्कीच कमी पडतोय म्हणुन तर गेली १० वर्षे महाराष्ट्रात अजुन सत्तापरिवर्तन झालेले नाही.
आता श्री. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर आणा. त्यांच्या सभांना होणारी गर्दी डोळ्यासमोर आणा. हे काही एका दिवसात घडलेलं नाही. आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष उभा करताना त्यानी गेली ३-४ वर्षे प्रचंड मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्यासारखे दुसरे कोणी स्टार नेते मनसेमध्ये नाही. राज ठाकरे यांना मेधावी वक्तृत्वशैली लाभलेली तर आहेच पण खासकरून त्यांच्या भाषणात जाणवणारी त्यांची तळमळ, जिद्द आणि आत्मविश्वास लोकांच मन जिंकणारे आहे. ह्यामुळेच आज राज ठाकरें किशोरवयीन आणि तरुण वर्गामध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.
राज ठाकरे यांनी निरनिराळ्या मुद्द्यांवर मराठी माणसाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे थोडा का होइना मराठी समुदाय आता जागरुक होऊ लागला आहे… विचार करायला लागला आहे. हेच तर राज ठाकरेंना हवे आहे. ह्यासाठी त्यांना कुण्या इतर राजकीय नेत्यांसोबत जाण्याची किंवा इतर पक्षांसोबत युती करण्याची आवश्यकता नाही.
इतिहास घडवायला एक माणूस पुरेसा असतो.
राज ठाकरे पुरेसा आहे…
इतिहास घडणार…
लवकरच…
२०१४
एनव्हीडीया (NVIDIA) विरुद्ध इंटेल (Intel)
ऑक्टोबर 17, 2009
होय…
आपण कदाचित या दोन्ही ब्रॅण्डशी परिचित असाल. नसाल तर सांगतो, Intel ही micro-processor बनवणारी महाबलाढ्य कंपनी आहे, तर NVIDIA ही गेमिंग-ग्राफिक्स मधे अग्रगण्य असा ब्रँड आहे. स्पष्टपणे सांगायचं झालं तर, NVIDIA ही कंपनी Graphics card किंवा GPU (ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट) बनविण्यात आघाडीवर आहे. NVIDIA आता processor मार्केट मध्ये जोरदार धडाका देण्यास सज्ज झाली आहे आणि Intel ला नजीकच्या भविष्यात मोठा प्रतिस्पर्धी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
ही NVIDIA च्या सूत्रांकडून मिळालेली अनधिकृत बातमी आहे. नुकतेच NVIDIA चे उपाध्यक्ष ‘माईकल हॅरा‘ यांनी NVIDIA एक X–86 तंत्रावर आधारित processor बनवित असल्याचे सांगितले होते. NVIDIA चा हा प्रोसेसर ३ ते ४ वर्षात उपलब्ध होईल असा अंदाज आहे. नुकताच NVIDIA ने त्यांचा TEGRA–650 हा मोबाइल–इंटरनेट–डिवाइस (MID) वर आधारित processor रिलीज केलाय. आता प्रश्न हा पडतो की हे ह्या NVIDIA वाल्यांना Processor Development मध्ये एवढा कसा बर इंट्रेस्ट आलाय?
मित्रांनो हे सगळ जे घडलय ना ते फक्त Intel मुळेच बर का! (आश्चर्यचकित होऊ नका) काय आहेकी हे Intel वाले सध्या ग्राफिक्स कार्ड च अस्तित्वच संपविण्याची भाषा बोलत आहेत. Intel आणि AMD सध्या CPU आणि GPU (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट वा ग्राफिक्स कार्ड) ह्या दोन्हीगोष्टी एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. इंटेलच Larrabee तंत्रज्ञान हे याच मिशनच फळ आहे. Larrabee हे NVIDIA च्या CUDA व TESLA तंत्रज्ञानाच्या तुलनेत अधिक scalable व flexible असेल अस Intel सांगतो. आता NVIDIA ला जर त्याची जागा टिकवून ठेवायची असेल तर त्यालापण Processor Development च्या दृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत.
अरे हो! हा MID काय प्रकार आहे ते मी सांगायलाच विसरलो बरं का. MID किंवा Mobile Internet Devices ही अत्यंत शक्तिमान आणि अत्याधुनिक संपर्क साधने आहेत. ही आपल्या पारंपरिक PDA फ़ोनच्या जरा एक पाऊल पुढेच आहेत. आपण जर पुढच्या पिढीचे संगणक कसे असतील ह्याचा जर विचार केला तर ती आपल्या हातांमध्ये विराजमान होतील याबद्दल दुमत होणार नाही. ह्या MIDs ला सध्याच्या आणि पुढच्या पिढीच्या संगणककांमधला दुवा मानता येइल. NVIDIA नेही नेमका हाच धागा पकडून Processor Development मध्ये उडी घेतली आहे. NVIDIA चं TEGRA 650 हे MID चे इंजिन आहे. खास गोष्ट म्हणजे Microsoft आणि NVIDIA ह्या दोघांनी यावर मेहनत घेतली आहे. आता Microsoft चे Window Mobile हे NVIDIA च्या तंत्रज्ञानाने अधिक सशक्त बनतील यात वाद नाही.
ह्याव्यतिरिक्त सध्याच्या desktop आणि laptops साठी NVIDIA च्या काय योजना आहेत ते काही फारसं स्पष्ट झालेलं नाही आहे. बघुया काय होतं ते….(ह्यापलिकडे अजुन आपण काय करु शकतो?)
आपले परप्रांतीय मराठी बांधव
ऑक्टोबर 17, 2009आपल्या येथे मूळ उत्तर-प्रदेशचे परन्तु आता महाराष्ट्रीय झालेले असे अनेक लोकं आहेत. त्यातले बहुसंख्य अस्लिखित मराठी बोलतात…आपल्यासोबतच गुण्यागोविंदाने येथे राहतात…आणि महत्वाचं म्हणजे मराठी संस्कृतीशी एकरूप होतात…मग तो गणेशोत्सव असो की गोकुळाष्टमीची धूम….आपल्या आनंदात समरस होतात….आपल्या सुखदु्:खात सामील होतात…
आपणही ह्या लोकांचा कधी तिरस्कार केला नाही कारण ह्या लोकांनी आपल्याला कधी काही उपद्रवच केला नाही. सगळ कसं एकदम सुरळीत सुरु होतं. पण………..
पण गेल्या काही वर्षात सगळ चित्रच पालटलं. उत्तर-प्रदेश आणि बिहार मधून रेलवे गाड्या भर-भरून माणसे इथे येऊ लागलीत…. इथले फूटपाथ व्यापू लागलीत…..झोपड्या बांधू लागलीत… हा-हा म्हणता म्हणता मुंबई या स्वप्ननगरिचे एका बकाल शहरात रूपान्तर झाले…………….तरीही आम्ही काही बोललो नाही.
पण जेव्हा ह्या लोकांची इथे दादागिरी सुरु झाली आणि आपल्याला जेव्हा त्याचा त्रास व्हायला लागला तेव्हा कुठे आपल्याला वाटायला लागलं की अरे! ह्या झुंडिन्ना किंवा लोंढयाना कसेही करून थांबवले गेलेच पाहिजे. अन्यथा हे भड़वे उदया आपल्याच उरावर चढ़तील आणि वरून आपल्याच कानफटात मारतील.
हा धोका राजसाहेबांनी ओळखला आणि ही महत्वाकांक्षी मोहिम हाती घेतली. मला पूर्ण खात्री आहे की राजसाहेब ह्या लोंढयाना थांबवतीलच आणि बेकायदेशीरपणे राहणा-यांचाही ते योग्य तो बंदोबस्त करतील. आपणही त्यांना संपूर्ण सहकार्य करूया पण जे मुळचे परप्रांतीय आहेत आणि आता मराठी झालेले आहेत त्यांना धिक्कारून चालणार नाही. त्यांना सोबतच घेउन चालावं लागेल.
“कारण ते आता भैय्या राहिलेले नाहीत…ते आता आपले भाऊ झालेले आहेत.”